अजित पवारांची मोठी घोषणा : एसटीच्या तिकीट दरात आजपासून होणार वाढ

By Pramod

Published On:

Follow Us
st ticket rate increase

मंडळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) गेल्या तीन वर्षांत तिकीट दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दरम्यान, या वर्षी एसटी सेवेत अनेक नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे एसटीचा प्रवास महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असल्याचे वृत्त चर्चेत असले तरी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

आज माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी सांगितले की, एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारकडे आलेला नाही. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या एसटी सेवा सुधारण्यावर भर दिला जात असून, प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या बसेस पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रवासाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न

अजित पवार यांनी असेही नमूद केले की, एसटी बससेवेचा दर्जा सुधारल्याशिवाय तिकीट दरात वाढ करणे योग्य होणार नाही. त्यांनी म्हटले, जर बस खराब असतील आणि भाडेवाढ केली गेली, तर प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे एसटीच्या दर्जात सुधारणा करणे, हे आमचे प्राथमिक लक्ष्य आहे.

भविष्यातील निर्णयावर संकेत

उपमुख्यमंत्र्यांनी सध्या तिकीट दरवाढीचा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचे सांगितले असले तरी भविष्यात योग्य तो निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. एसटीच्या नवीन बसेस सेवेत आल्यावर आणि प्रवासाच्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा झाल्यावर तिकीट दरवाढीचा विचार केला जाईल, असे त्यांनी सूचित केले.

प्रवाशांना तूर्तास दिलासा

तूर्तास प्रवाशांना तिकीट दरवाढीपासून दिलासा मिळाला असला तरी भविष्यात दरवाढ होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांनी पुढील काळात बदलांचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. भविष्यात एसटी सेवेत सुधारणा करूनच याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment