मंडळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 10 वर्षांवरील मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. RBI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 10 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेली मुले आता स्वतःचे बँक खाते उघडू शकतात आणि त्यावर नियंत्रण ठेवू शकतात. हा निर्णय आर्थिक साक्षरतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
पालकांच्या माध्यमातून खाते उघडण्याची सुविधा
RBI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही वयाच्या मुलासाठी बचत खाते किंवा मुदत ठेव खाते पालकांच्या नावावरून उघडता येईल. या ठिकाणी विशेष गोष्ट म्हणजे आईला देखील पालक म्हणून मान्यता दिली आहे.
10 वर्षांनंतर स्वतःचं खाते उघडता येईल
जेव्हा मुलं 10 वर्षांचे होतात, तेव्हा ते स्वतःच्या नावावर बँक खाते उघडू शकतात. यामध्ये काही मर्यादा असतील. उदाहरणार्थ ते केवळ ठराविक रक्कम जमा करू शकतात, मर्यादित व्यवहार करू शकतात, आणि जोखीम व्यवस्थापनाचे नियम पालन करणे आवश्यक असेल.
18 वर्षांनंतर खात्याचे पुनःप्रमाणन
जेव्हा अल्पवयीन खातेदार 18 वर्षांचे होतील, तेव्हा बँकांना खात्याचे पुनःप्रमाणन करणे आवश्यक असेल. यासाठी, बँकेला खातेदाराशी संपर्क साधून त्याची सही घेणे आवश्यक असेल.
ATM, डेबिट कार्ड, चेकबुक आणि इंटरनेट बँकिंगची सुविधा
अल्पवयीन खातेदारांना ATM, डेबिट कार्ड, चेकबुक, आणि इंटरनेट बँकिंगचा वापर देताना बँकांना जोखीम मूल्यांकनाचे धोरण पालन करणे आवश्यक आहे. बँकांना हे देखील स्पष्ट करणे आवश्यक आहे की, खाते कोण हाताळतं – मुलं की पालक.
KYC नियमांची काटेकोर अंमलबजावणी
या प्रक्रियेत बँकांना KYC (Know Your Customer) नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. यामुळे खातेदाराची ओळख, वय, आणि पालकत्व याची तपासणी केली जाईल.
या निर्णयामुळे मुलांना आर्थिक व्यवहारांची समज देणे आणि त्यांना बचत करण्याची गोडी लागणे, अशी अपेक्षा आहे.