मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. जुलै 2024 ते मार्च 2025 या कालावधीत हप्त्याचे पैसे महिला लाभार्थ्यांना मिळाले आहेत, आणि आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.
अलीकडे एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने महिलांना गोड आनंद मिळणार आहे. यावर्षी लाभार्थ्यांची संख्या वाढेल की कमी होईल, याबाबत शंका व्यक्त केली जात होती, पण आता हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून, त्यांनी सांगितले की, काही महिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतला होता. अशा अर्जदारांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योजनेअंतर्गत बनावट अर्जदारांना कोणतेही मानधन वितरित करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सखोल चौकशी करून अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत जवळपास 11 लाख अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम असून, त्याद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.