नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकदा पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या या योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी दिला जाईल, यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलचा हप्ता मे महिन्यातून दिला जाऊ शकतो. एप्रिल महिना संपण्यास काहीच दिवस शिल्लक असताना, योजनेसंबंधी कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं होतं. त्यानुसार एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. तथापि, महिना संपायला केवळ ६ दिवस बाकी असताना, हप्त्याची तारीख लांबणीवर टाकली जाऊ शकते. जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर, एकत्र ३००० रुपये देण्यात येतील की दोन टप्प्यांत १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला जाईल, हे देखील शंका विचारले जात आहे.
लाडकी बहीण योजनेत अर्जाची पडताळणी सुरू आहे. सध्या महिलांच्या उत्पन्नाची तपासणी केली जात आहे, ज्यामुळे अनेक अर्ज नाकारले गेले आहेत. त्याचप्रमाणे, ज्या महिलांचे उत्पन्न निर्धारित निकषांमध्ये बसत नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
आदिती तटकरे यांनी योजनेसंबंधी अजून काही महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेत अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच फायदा होईल. तसेच, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे, नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपयेच देण्यात येणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.