लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणी 1500 मध्येच खुश , पहा सविस्तर माहिती

By Pramod

Published On:

Follow Us
ladki bahin yojana new update

मंडळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा विजय मिळाला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती सरकारने एकहाती सत्ता मिळवली होती. या योजनेचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणे, जेव्हा योजनेचा लाभ महिलांना देण्यात आला, तेव्हा महायुती सरकारने याची कौतुक केली होती.

निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकारने जाहीर केले होते की, जर ते निवडून आले, तर लाडकी बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये दिले जातील. मात्र सरकारच्या तिजोरीवरचा दबाव पाहता अद्याप या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहिणींना २१०० रुपये देण्याचा कोणी जाहीर केलेला नाही. १५०० रुपये पुरेशे आहेत, आणि लाडकी बहिणी त्यात खुश आहेत. त्यांच्या मते, विरोधकांनी महायुती सरकारवर आरोप केले होते की, ते १५०० रुपये देखील देणार नाहीत, पण आता सरकारने १५०० रुपये दिल्यानंतर विरोधकांनी २१०० रुपयांचा मुद्दा उचलला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, लाडकी बहिणींना १५०० रुपये पुरेशे आहेत आणि त्यामध्ये त्या खुश आहेत. असे विधान करून त्यांनी विरोधकांच्या आरोपांना नकार दिला.

यातच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या पैसे पात्र महिलांच्या खात्यात वितरीत केले जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. एप्रिल महिना संपण्याच्या तीन दिवस आधी देखील या पैसे प्राप्त झालेले नाहीत, त्यामुळे लाडकी बहिणींचे लक्ष अजूनही या रकमेसाठी लागले आहे.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment