मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. योजनेचा लाभ अपात्र महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यामुळे सरकारने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
1) एका घरातील फक्त एका महिलेला लाभ दिला जाईल.
2) घरामध्ये चारचाकी वाहन असल्यास, त्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
3) लाभार्थीने आर्थिकदृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
सरकारने आता अर्जांची पुनर्तपासणी सुरू केली आहे. योजनेसाठी पात्र नसतानाही ज्या महिलांनी लाभ घेतला आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा त्यांच्याकडून योजनेचे पैसे आणि दंड वसूल केला जाईल.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, योजनेचा उद्देश गरजू आणि गरीब महिलांना मदत करणे हा आहे. त्यांनी अपात्र महिलांनी योजनेतून स्वतःहून नाव काढावे, अशी सूचना केली आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरीब आणि पात्र महिलांसाठी महत्त्वाची आहे. योजनेचा अपव्यय होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. महिलांनी सरकारच्या सूचनांचे पालन करून या योजनेचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा.