लाडकी बहीण योजना : या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार !

By Pramod

Published On:

Follow Us
ladki bahin yojana get 3000 rupees

मंडळी राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ₹1500 रुपये थेट जमा केले जातात. नुकताच एप्रिल महिन्याचा हप्ता काही महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. आता महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

विधानसभा निवडणुकांपूर्वी या रकमेचा वाढवून ₹2100 करण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला होता, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान, काही महिलांना मे महिन्यात ₹3000 मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे – कोणत्या लाभार्थींना हे दुप्पट पैसे मिळणार?

कोणाला मिळणार ₹3000?

ज्या महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता तांत्रिक अडचणीमुळे जमा झाला नाही, अशा लाभार्थींना एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्रित ₹3000 मिळू शकतात. परंतु हे पैसे फक्त त्याच महिलांना मिळतील ज्या अजूनही योजनेसाठी पात्र आहेत. अन्यथा त्यांचा लाभ थांबवण्यात येऊ शकतो.

आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते एप्रिल या दहा महिन्यांत महिलांच्या खात्यात एकूण ₹15,000 रुपये जमा झाले आहेत. अनेक गरजू महिलांसाठी ही रक्कम घरखर्च भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. ही योजना आज लाखो कुटुंबांसाठी आधारस्तंभ ठरली आहे.

मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?

एप्रिल महिन्याचा हप्ता मेच्या दुसऱ्या तारखेपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

टीप — योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी आपली पात्रता तपासणे आणि अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती घेणे गरजेचे आहे.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment