मंडळी महाराष्ट्र शासनाद्वारे महिलांसाठी राबवली जाणारी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला राज्य सरकारकडून १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र एप्रिल महिना संपत आला असताना देखील अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की, एप्रिल महिन्याचे १५०० रुपये ३० एप्रिलपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतील.
सध्या योजनेसाठी आलेल्या अर्जांची तपासणी सुरु असून, ठरवलेल्या निकषांनुसार अपात्र महिलांना या योजनेपासून वगळण्यात येत आहे. योजनेच्या नियमांनुसार ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही. याआधीच अंदाजे ९ लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
लाभार्थींनी थोडा संयम बाळगावा, कारण योजनेचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.