लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , जाणून घ्या सविस्तर माहिती

By Pramod

Published On:

Follow Us
ladki bahin yojana big update

मंडळी राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत एप्रिल 2025 चा हप्ता नुकताच 2 मे रोजी लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आला. सुरुवातीला या रकमेच्या जमा होण्याची अपेक्षा 30 एप्रिलपूर्वी होती, विशेषता अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर. मात्र प्रत्यक्षात एप्रिलचा हप्ता मे महिन्यात आला, ज्यामुळे महिलांमध्ये पुढील हप्त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

एप्रिलचा हप्ता उशिरा मिळाल्याने, मे महिन्याच्या हप्त्याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार एप्रिल आणि मेचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता होती, पण प्रत्यक्षात एप्रिलचा हप्ता स्वतंत्रपणे देण्यात आला. याआधी मार्च महिन्यात फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यामुळेच यावेळीही तशीच अपेक्षा होती.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता, तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. योजनेतील गेल्या काही महिन्यांचे अनुभव पाहता, हप्त्याचे पैसे बहुधा महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जमा होत असल्याचे दिसून आले आहे.

१५०० की २१०० रुपये?

सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै 2024 पासून एप्रिल 2025 पर्यंत एकूण दहा हप्ते वितरित झाले आहेत. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीकडून हप्त्याची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

अद्याप शासन स्तरावर याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील पूर्वीप्रमाणे १५०० रुपयांचाच राहणार आहे.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment