लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेला मिळणार साडी ………

By Pramod

Published On:

Follow Us
ladki bahin yojana akshay tritiya saree gift

मित्रांनो राज्य सरकारने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. मात्र होळी आणि गुढीपाडवा सण संपून एक महिना झाला तरीही दिंडोरी व पेठ तालुक्यातील लाभार्थी महिलांच्या हाती साड्या पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे ही योजना आता अक्षयतृतीयेला प्रत्यक्षात राबवली जाणार आहे.

राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांमार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साड्या देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने तयारी केली होती. दिंडोरी तालुक्यातील १३ हजार १२७ लाभार्थिनींसाठी ८ एप्रिल रोजी साड्यांचा साठा तालुका गोडावनात दाखल झाला.

त्यापैकी १४ एप्रिलपर्यंत १७३ स्वस्त धान्य दुकानांपैकी ७३ दुकानांमध्ये ६ हजार ९५ साड्यांचे वितरण करण्यात आले. उर्वरित १०० दुकानांमध्ये साड्या पोहोचवण्याचे काम सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी दिली.

पेठ तालुक्यातील १० हजार ७८२ लाभार्थिनींसाठीही ९ एप्रिल रोजी साड्यांचा साठा प्राप्त झाला आहे. स्वस्त धान्य दुकानांपर्यंत साड्या पोहोचवण्याचे काम सुरू असून लवकरच वितरण पूर्ण होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

होळी सणासाठी जाहीर केलेली मोफत साडी वाटप योजना महिनाभराच्या विलंबाने अंमलात येत असल्यामुळे लाभार्थी महिलांना साड्या होळीऐवजी अक्षयतृतीयेला मिळणार आहेत.

वणी येथे अंत्योदय योजनेंतर्गत ६६९ लाभार्थी आहेत. त्यापैकी ६५० साड्या प्राप्त झाल्या असून, २१ एप्रिलपासून धान्याबरोबर साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

लाभार्थी महिलांनी वेळोवेळी रेशन दुकानदारांकडे साड्यांच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली होती. तरीही महिना उलटून गेला तरी साड्या मिळाल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वणी येथील लाभार्थी रोहिणी मोरे यांनी भावनेने सांगितले की, शासनाने होळीच्या निमित्ताने साडी भेट जाहीर केली होती. आम्ही रेशन दुकानात अनेकदा चौकशी केली, मात्र अद्याप साडी मिळालेली नाही.

साड्यांचा साठा ८ एप्रिल रोजीच तालुक्यात प्राप्त झाला असून सध्या तो स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. साड्या लवकरात लवकर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून स्वस्त धान्य दुकानांच्या संचालकांना आवश्यक सूचना दिल्या असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment