मंडळी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी विशेषतः गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्ये
अन्नपूर्णा योजनेत महिलांना मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये पहिला सिलिंडर वितरित करण्यात आला होता. उर्वरित दोन सिलिंडर लवकरच दिले जातील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील अटी लागू आहेत.
1) लाभार्थी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
2) महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ची लाभार्थी असावी.
3) महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेत बदल अपेक्षित
लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात. या रकमेविषयी अनेक चर्चा सुरू असून, ती वाढवून २१०० रुपये करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रस्तावाची घोषणा होण्याची शक्यता होती, पण महिला व बालविकास विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत शिफारस करण्यात आलेली नाही.
महिलांसाठी सकारात्मक पाऊल
या योजना गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. मोफत गॅस सिलिंडर आणि आर्थिक मदतीमुळे त्यांना जीवनमान उंचावण्यासाठी संधी मिळेल. महिलांना मिळणाऱ्या मदतीत लवकरच सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.