जिओने आपल्या ग्राहकाला केले खुश, जिओने आणला जबरदस्त प्लान

By Pramod

Published On:

Follow Us
jio best recharge plan offer

मंडळी काही दिवसांपूर्वी ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा देणारे रिचार्ज प्लान्स सादर करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामागचा मुख्य हेतू डेटा वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी नव्या पर्यायांचा विचार करण्याचा होता, परंतु डेटा न वापरणारे आणि फक्त कॉलिंग किंवा एसएमएस सेवा वापरणारे युजर्स हे या बदलामुळे अधिक फायदे घेऊ शकतील. ट्रायच्या या आदेशानंतर, रिलायन्स जिओने दोन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत, जे फक्त कॉलिंग आणि एसएमएसच्या सेवा देतात.

रिलायन्स जिओने ₹458 आणि ₹1958 असे दोन नवे प्लॅन्स लॉन्च केले आहेत. जिओच्या या दोन्ही प्लॅन्समध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि जिओ सिनेमा व जिओ टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस मिळणार आहे. जिओने याआधी ₹479 आणि ₹1899 चे प्लॅन्स आपल्या लिस्टमधून काढून टाकले आहेत. चला तर मग, जिओच्या नव्या रिचार्ज प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

₹458 चा प्लान

जिओचा ₹458 चा प्लान 84 दिवसांची वैधता देतो. यामध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि 1000 एसएमएस मिळतात. याशिवाय जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस देखील मिळतो. हा प्लान खास करून त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, जे फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा वापरतात आणि डेटा न वापरण्याचा निर्णय घेतले आहेत.

₹1958 चा प्लान

₹1958 चा प्लान युजर्सला 365 दिवसांची (1 वर्ष) वैधता देतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग, 3600 फ्री एसएमएस आणि जिओ सिनेमा व जिओ टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो. हा प्लान त्यांच्यासाठी आदर्श आहे, जे एक वर्षभर कॉलिंग आणि एसएमएस सेवा वापरण्याचा विचार करत आहेत.

हटवलेले प्लॅन्स

रिलायन्स जिओने काही वेळा पूर्वी ₹479 आणि ₹1899 चे रिचार्ज प्लॅन्स आपल्याला उपलब्ध करून दिले होते, नवीन नियमानुसार जिओने या दोन प्लॅन्सला आपल्या लिस्टमधून काढून टाकले आहे.

ट्रायच्या या नव्या आदेशामुळे, जिओच्या ग्राहकांना एक उत्तम पर्याय मिळालाय, विशेषता अशा ग्राहकांना, जे फक्त कॉलिंग व एसएमएस सेवा वापरणे पसंत करतात. यामुळे त्यांना अधिक किफायतशीर आणि खर्च कमी असलेले प्लॅन्स उपलब्ध होऊ शकतात.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment