सरकारची खास योजना : लाडक्या बहिणी होणार मालामाल …….. जाणून घ्या सविस्तर माहिती

By Pramod

Published On:

Follow Us
government special scheme for ladki bahin

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींना दरमहा एक हजार ५०० रुपये बँक खात्यावर जमा होत असल्याने या बहिणींना हे ‘पैसे कसे वापरायचे’ याचे धडे राज्यसरकारच्या वतीने दिले जाणार आहेत. त्यासाठी राज्याच्या महिला विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. नागपूरमध्ये काही लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटे व्यवसाय सुरू केल्याने सरकारने या महिला सक्षमीकरणाला बळ देण्याचे ठरवले आहे.

कृती आराखडा तयार करणार

गावातील काही महिला एकत्र येऊन दीड हजार रुपयातील हजार रुपये जमा करुन एका महिलेला दरमहा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करीत आहेत.

५०-१०० लाडक्या बहिणी एकत्र येवून भिशीच्या माध्यमातून ५० हजार ते एक लाख रुपये जमा करीत आहेत. हा निधी प्रत्येक बहिणीला लघु व्यवसायासाठी उपलब्ध करुन दिला जात आहे.

त्यातून वडापाव व अन्य खाद्यापदार्थांच्या गाड्या, छोटे स्टॉल व छोटे उद्याोग सुरू होत आहेत. या योजनेमुळे लाडक्या बहिणी व्यावसायिकही होऊ लागलेल्या आहेत. महिला वर्गाने या निधीचे योग्य नियोजन करुन स्वबळावर उभे राहण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी महिला विकास विभाग लाडक्या बहिणींना गावोगावी तसेच शहरी भागातही सरकारने दिलेल्या पैशाचे नियोजन कसे करायचे याचे धडे देणार आहे. त्याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

चाचपणी सुरू

महिला आर्थिक साक्षरतेमध्ये दीड हजार रुपयांचे अंदाजपत्रक, कर्ज, बचत, व गुंतवणूक या प्रशिक्षणामध्ये शिकवली जाणार आहे. एका बहिणीच्या पैशाने व्यवसाय उभे राहणार नाहीत पण अनेक बहिणी एकत्र आल्यानंतर व्यवसायाची साखळी तयार केली जाऊ शकते यासाठी महिला विकास विभाग हा अधिक प्रयत्नशील आहे. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाणार आहे.

राज्यातील लाखो बचत गटांचे आर्थिक नियोजन, व्यवसाय वृध्दीसाठी हे महामंडळ कार्यकरत आहे. विशेष म्हणजे या महामंडळाचे महिलांनी घेतलेले कर्ज वेळेवर परत दिल्याने महामंडळाचा वसूली दर १०० टक्के आहे.

लाडक्या बहिणींना या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यांना मिळणाऱ्या योजनेतील लाभामधून कर्जाची ही रक्कम मासिक हप्ता मंडळाला हक्काने मिळणार आहे.

याशिवाय दीड हजारातून काही रक्कम म्युच्युअल फंडांच्या एसआयपी ( सिस्टीमिटीक इन्व्हेसमेंट प्लॅन) सारख्या नवीन गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवता येईल का, याची चाचपणी सध्या महिला विकास विभाग करणार आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment