मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : लाडक्या बहिणींसाठी सरकारची नवीन योजना ……

By Pramod

Published On:

Follow Us
e rikshaw yojna for ladki bahin

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया राज्य सरकारने सुरू केलेल्या पिंक इ रिक्षा या योजनेबाबत अधिक माहिती

एक वेळ अशी होती की अनेक महिलाना आपल्या घरासाठी स्वतःच्या इच्छांना लपवून ठेवावं लागत होतं. आजही काही ठिकाणी ही परिस्थिती दिसते. पण त्याच वेळी अनेक महिलांनी आपले संसार सांभाळत, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहिलं.

आता काळ बदलतो आहे, त्या स्वप्नांना पंख देणारा निर्णय घेतलाय महाराष्ट्र सरकारने. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला, आणि आता त्याच संकल्पनेतून पुढे आलेली पिंक ई-रिक्षा योजना खरंच सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाचं गिफ्ट ठरली आहे.

राज्यातील १०,००० गरजू महिलांना स्वतःची रिक्षा देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पिंक ई-रिक्षा वितरित करण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे ही योजना फक्त नागपूर पुरती मर्यादित नाही, तर या योजनेचा पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही हळूहळू विस्तार करण्यात येणार आहे.

अनेक महिलांनी योजनेच्या पहिल्याच टप्प्यात अर्ज केले आणि केवळ नागपूरमध्येच तब्बल ११,००० अर्ज दाखल झाले होते. त्यातील २,००० महिलांना त्यांच्या हातात सशक्ततेचं स्टीयरिंग देण्यात आलं आहे.

अर्ज कसा करायचा ? | Pink E Rickshaw Online Form

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच ऑनलाईन सुरू होणार आहे. संबंधित जिल्हा प्रशासन व महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येईल. आवश्यक त्या कागदपत्रांसह महिला आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकतील. त्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो लागणार आहेत.

ही योजना म्हणजे केवळ एका रिक्षेचं वाटप नाही, तर महिलांसाठी एक मोठी संधी आहे. ज्या महिला घरातच कैद झाल्या आहेत, त्यांना बाहेरचं जग पाहण्याची, काहीतरी करून दाखवण्याची संधी देणं म्हणजे खरोखरच सशक्तीकरण च्या दिशेने मोठं पाऊल आहे.

माझी लाडकी बहीण आता केवळ आई, बहीण, पत्नी नाही तर चालक, उद्योजिका, आणि स्वतःच्या आयुष्याची मालकीण सुद्धा बनणार आहे. सर्व पात्र महिलांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment