BSNL चं 5G सिम कार्ड फक्त दीड तासात पोहोचेल घरी , पहा सविस्तर माहिती

By Pramod

Published On:

Follow Us
bsnl 5g sim home delivery

मित्रांनो सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच आपल्या 4G आणि 5G सेवा सुरु करणार आहे. या सेवांसाठी कंपनीने विशेष तयारी केली असून, ग्राहकांना 4G आणि 5G SIM कार्ड्सची घरपोच सेवा सुरु केली आहे. ही सिमकार्ड्स ग्राहक फक्त 90 मिनिटांत घरबसल्या प्राप्त करू शकतात.

SIM कार्ड घरपोच मिळवण्याची प्रक्रिया

ग्राहकांना BSNL चे 4G किंवा 5G SIM कार्ड हवे असल्यास, त्यासाठी कंपनीच्या अधिकृत पार्टनर वेबसाईटवर https://prune.co.in/ जावे लागेल. तिथे आवश्यक माहिती भरल्यानंतर SIM कार्डचं बुकिंग करता येईल. यानंतर, फक्त 90 मिनिटांत सिमकार्ड ग्राहकाच्या पत्त्यावर डिलिव्हर केलं जाईल.

BSNL ची 5G सेवा – एक नविन वाटचाल

BSNL ला नुकतेच 5G साठी आवश्यक असलेले 700 MHz आणि 3300 MHz या बँड्समध्ये स्पेक्ट्रम मिळाले आहे. यामुळे आता BSNL देखील रिलायन्स जिओ आणि एअरटेलसारख्या खाजगी कंपन्यांना टक्कर देण्यास सज्ज आहे.

टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 6-7 महिन्यांत BSNL ने तब्बल 55 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. ग्राहक वाढीबरोबरच कंपनी नफ्यात आणण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे.

ग्राहक सेवा आणि तांत्रिक सुधारणा

BSNL ने आपल्या सेवा सुधारण्यासाठी एप्रिल महिना कस्टमर सर्व्हिस मंथ म्हणून जाहीर केला होता. या कालावधीत ग्राहकांकडून फीडबॅक घेऊन त्यांच्या अनुभवात सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

4G ते 5G कडे वाटचाल

जूनपासून BSNL आपल्या 4G नेटवर्कचं 5G मध्ये अपग्रेड करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत जवळपास एक लाख 4G साइट्स उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे, यातील सुमारे 89,000 साइट्स आधीच बसवण्यात आल्या आहेत.

Pramod

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment