मंडळी 2024 च्या दिवाळीपर्यंत BSNL ची 4G सेवा सुरू होईल, अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे ही अंमलबजावणी विलंबाने होत आहे. आता ही सेवा जून-जुलै 2024 दरम्यान सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री शिंदे यांनी सांगितले की, BSNL ने तब्बल 18 वर्षांनंतर प्रथमच तिमाही नफा नोंदवला आहे, जो एक महत्त्वाचा टप्पा आहे. 4G सेवेसंदर्भात त्यांनी सांगितले की, आतापर्यंत 90,000 टॉवर्स उभारण्यात आले असून त्यातील 76,000 टॉवर्सना मंजुरी मिळाली आहे. येत्या जुलै महिन्यापर्यंत 1 लाख टॉवर्स उभारण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर सेवा गुणवत्तेची चाचणी घेतली जाईल.
जेव्हा त्यांना विचारण्यात आले की 1 लाख टॉवर्स पुरेसे ठरतील का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, प्रथम हे टॉवर्स पूर्णपणे कार्यरत व्हावेत, त्यानंतर नेटवर्कची आवश्यकता असल्यास त्याचा विस्तार केला जाईल.
BSNL ची 5G सेवा कधी सुरू होईल?
BSNL 5G सेवेसंदर्भात विचारले असता शिंदे यांनी स्पष्ट केले की, 5G सेवा सध्या सुरु होणार नाही. प्रथम 1 लाख 4G टॉवर्स कार्यान्वित करून नेटवर्क स्थिर करण्यात येईल. त्यानंतरच 4G वरून 5G कडे स्विच केला जाईल. मात्र 4G वरून 5G कडे वळणे तांत्रिकदृष्ट्या अवघड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की भारत सरकारने BSNL साठी कोअर नेटवर्क आणि रेडिओ एक्सेस नेटवर्क (RAN) चे स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आज भारत हा 4G आणि 5G तंत्रज्ञान स्वता विकसित करणाऱ्या मोजक्या 4-5 देशांपैकी एक बनला आहे.