मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (महाराष्ट्र बोर्ड) पहिल्यांदाच दहावी व बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेच्या आधी घेतल्या आहेत.
परीक्षा वेळापत्रक आणि पूर्णता
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होऊन 11 मार्च 2025 पर्यंत पार पडली. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होऊन 17 मार्च 2025 रोजी संपली.
बोर्डाकडून उत्तरपत्रिकांची तपासणी निर्धारित वेळेत पूर्ण झाली आहे. सध्या युद्धपातळीवर त्यांची पडताळणी सुरू असून निकालाच्या छपाईचं काम देखील सुरू झालं आहे.
निकाल जाहीर होण्याची संभाव्यता
महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीचे निकाल 15 मे 2025 च्या आधीच जाहीर करण्यात येणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, बारावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे, तर दहावीचा निकाल 15 किंवा 16 मे 2025 रोजी घोषित केला जाऊ शकतो. सध्या गुणपत्रक छपाईचे काम अंतिम टप्प्यात असून, 11 मे पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती मिळाली आहे.
शिक्षणमंत्र्यांकडून अधिकृत घोषणा लवकरच
निकालाची अंतिम अधिकृत तारीख राज्याचे शिक्षणमंत्री लवकरच जाहीर करतील. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता फारशी लांबणारी नाही.