मित्रांनो राज्यातील दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षा लवकरच त्यांच्या निकालांसह संपन्न होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये या निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
परीक्षा कालावधी व निकालाची वेळ
बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होऊन 18 मार्च 2025 रोजी संपली, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून 17 मार्च 2025 पर्यंत घेण्यात आली. त्यामुळे बारावीचा निकाल दहावीच्या आधी जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
निकाल ऑनलाइन कसा पाहायचा?
विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांचा उपयोग करता येईल:
mahresult.nic.in
mahahsscboard.in
msbshse.co.in
hscresult.mkcl.org
या संकेतस्थळांवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर आणि आईचे नाव भरल्यावर त्यांचा निकाल स्क्रीनवर दिसेल.